निंभोरा । जिल्हा पोलीस दलातर्फे प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच विसर्जनासाठी विशेष बक्षीस ठेवण्यात आले होते. यात निंभोरा हद्दीत 29 गावांपैकी चार गावांना बक्षिसे जाहिर झाली असून यात प्रथम बक्षिस निंभोरा येथील नरवीर तानाजी मालुसरे गणेश मंडळ तर द्वितीय तांदलवाडी येथील सर्वज्ञ गणेश मंडळ, तृतीय बक्षिस स्वस्तिक गणेश मंडळ, तृतीय बक्षिस स्वस्तिक गणेश मंडळ, खिर्डी खुर्द तर विशेष बक्षिस नवरंग गणेश मंडळ, राणे गल्ली विवरा बु. यांना जाहीर करण्यात आले.
शांतता बैठकीत केली मंडळांची नावे जाहीर
निंभोरा पोलीस ठाण्यात गणपती उत्सव, दुर्गा उत्सव बैठकीत व शांतता कमिटीची बैठक पार पडली. प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी पारितोषिक प्राप्त मंडळांची नावे जाहिर केली. एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवणारे जुने निंबोल, विटवा, वडगाव, पुरी, गोलवाडे, सिंगत, दसनुर, निंभोरा सिम येथील मंडळांचा गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, सरपंच डिगंबर चौधरी, कडू चौधरी, अमनखान पठाण, डॉ. सुधाकर चौधरी, राजीव बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस रमेश येवले, दस्तगीर पटेल, खिर्डी येथील पोलीस पाटील प्रदीप पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे यांनी तर सुत्रसंचालन पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश वराडे यांनी केले. आभार पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पाटील यांनी मानले.