खिर्डी। चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव परिसर व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाविषयी समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक वानखेडे यांनी केले मार्गदर्शन
या कार्यक्रमाला चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सचिव उदय चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना चातक निसर्ग संवर्धन संस्थेचा परिचय करुन दिला. याप्रसंगी निंभोरा पोलिस स्टेशन आवारात नवनिर्वाचीत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सचिव उदय चौधरी, प्रशांत पाटील, संकेत पाटील, अंकीत पाटील, सादीक पिंजारी, पत्रकार राजीव बोरसे, प्रवीण धुंदले, शेख इद्रीस, जितेंद्र कोळी, आशिष बोरसे, प्रा. दिलीप सोनवणे, येवले, सोनार व पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे व अधिकारी कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रत्येकाने वृक्षलागवड करण्यात आली.