निंभोरा : संपूर्ण गावातील मुख्य रस्त्यांसह ,गल्लीबोळात निंभोरा ग्रामस्थांतर्फे सोडियम हायप्रोक्लोराईड या निर्जंतुक करणार्या औषधांची नुकतीच फवारणी करण्यात आली. यावेळी डॉ.एस.डी.चौधरी, दुर्गादास पाटील, सुनील कोंडे यांच्या पुढाकारातून ट्रॅक्टरद्वारे फवारणी मशीन स्प्रेयरने फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच डिगंबर चौधरी, उपसरपंच सुभाष महाराज, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर सोनवणे, सतीश पाटील, स्वानंद कृषीचे अध्यक्ष गिरीश नेहेते, उपाध्यक्ष सुधीर मोरे, सचिव गुणवंत भंगाळे यांच्यासह रवींद्र बारी, हर्षल ठाकरे, राज खाटीक, किरण सपकाळे, शिवाजी पाटील, संजय महाजन, विशाल तायडे, चेतन बोरनारे या सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी राहुल महाले, निलेश भंगाळे, किशोर जावा, तिलक छप्रिबन, संजय आदिवाल आदींनी परीश्रम घेतले.
संपूर्ण गावात केली फवारणी
यावेळी फवारणीसाठी एक मोठ्या व एक छोट्या ट्रॅक्टरवर एचटीपी मशीन बसवून गावातील रस्त्यांवरील घरे, दरवाजे, लोखंडी ग्रील यांच्यासह पोलिस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडे बाजार चौक, मंदिर परीसर आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले. या फवारणीमुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.