निंभोरा : ग्रामपंचायतीतर्फे वडगाव रोडवरील नव्या जागेवर बाजार ओटे बनविलेल्या परिसरात बाजार भरण्याचे आवाहन करण्यात आल होते. मात्र त्यास स्थानिक भाजीपाला विके्रते, व्यापारी, शेतकरी यांनी विरोध दर्शविला होता. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने गुरुवारी सकाळपासूनच आलेल्या भाजीपाला विक्रेते व व्यापार्यांना नव्या जागी दुकाने लावण्याची सुचना केली. मात्र तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच दोन्ही पक्षांशी विचारविनिमय करण्यात आला.
इतर कामासाठी जागा वापरण्याच्या सुचना
सरपंच डिगंबर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रमेश येवले, मुजाहिद शेख, मधुकर बिर्हाडे, प्रभाकर सोनवणे, सतिश पाटील यांसह स्थानिक भाजीपाला विक्रेते, शेतकरी व व्यापार्यांची बैठक झाली. त्यात ग्रामपंचायतीने अडचणींची विचारणा केली मात्र ती जागा लांब असून त्या जागी महिलांना सुरक्षितता, पाण्याची व्यवस्था, उघड्यावर विहिरींचा बंदोबस्त, नवीन जागेवरील रस्ता, बैठकीचे नियोजन आदींबाबत चर्चा करीत ती जागा गावाच्या इतर कामासाठी वापरुन आहे त्या ठिकाणी बाजार भरविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच चौधरी यांनी शासकीय योेजना व त्याबाबत येणार्या अडचणींबाबत माहिती दिली. यासंदर्भात तहसिलदारांशी बोलून चर्चा घडविण्याचे सांगितले. यानंतर दोन्ही बाजुंनी समाधान झाल्यावर बाजार जुन्याच जागी भरण्याचे ठरले.