निंभोरा येथील ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

0

निंभोरा : येथील गणपती उत्सव, दुर्गात्सव उत्सव 2016 पोलीस, पत्रकार, ग्रामस्थ, शांतता समितीचे सदस्य व निंभोरा ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक जालिंदर सुपेकर यांची भेट घेतली. निंभोरा येथे सर्व समाजातील ग्रामस्थांनी व मंडळ पदाधिकार्‍यांनी निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या संकल्पनेतून गावातील सर्वांच्या विचाराने सहभागाने, उत्साहात, शांततेत, वेळेवर, गणपती उत्सव व दुर्गात्सव पार पाडला म्हणून मंडळाचा सन्मान व त्यांना बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

त्याबरोबरच भारतीय सैनिक जवान चंद्रकांत चव्हाण रा. सामनेर ता. पाचोरा हे आपले कर्तव्य बजावत असतांना चुकून पाकिस्तानच्या सिमेजवळील हद्दीत गेल्याने चव्हाण यांना पाकिस्तानने बंदिस्त केले आहे. तरी शासनाने त्वरीत याबाबत दखल घेवून सैनिक चव्हाण यांची सुटका होण्यासाठी प्रयत्न करावे. याबाबत निवेदनही जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सुपेकर हेदेखील उपस्थित होते. यावेळी बाजार समिती माजी उपसभापती दुर्गादास पाटील, सरपंच डिगंबर चौधरी, माजी सरपंच अमन खान पठाण, प्रल्हाद बोंडे, राजीव बोरसे, जितेंद्र कोळी, आरिफ खानर यांचा सहभाग होता.