निंभोरा येथील शेतमजुराचे घर आगीत खाक

0

निंभोरा:- गावातील दोडके वाड्यातील रहिवासी अशोक श्रावण दोडके यांच्या कुळ व मातीचे धाबे मिश्रीत घराला गुरुवारी सकाळी आग लागल्याने घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. अशोक श्रावण दोडके हे व त्यांची पत्नी शेतमजूर म्हणून दुसर्‍याच्या शेतात कामाला गेले असताना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक घर पेटले.

सकाळची वेळ असल्याने कुणाचेही आगीकडे लक्ष न गेल्याने आगीत कपाट, गादी, खाट, दोरीवरील सर्व कपडे, मजुरीतून कमविलेले हरभरे, गहू जळून खाक झाले. रहिवाशांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. आगीचा तलाठी झांबरे यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच डिगंबर चौधरी, सुनील कोंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर सोनवणे, भरत महाले, हेमराज दोडके, ललीत दोडके आदींनी पाहणी केली. तहसीलदार विजयकुमार ढगे व आमदार हरिभाऊ जावळे यांना आगीबाबत माहिती देण्यात आली.