निंभोरा येथे जातीय सलोख्याचे घडले दर्शन

0

निंभोरा । येथील मशिदीमध्ये शेवटच्या रोजाच्या निमित्ताने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आले. मौलाना अब्दुल रहेमान, एपीआय प्रकाश वानखेडे यांचा प्रा. संजय मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच अमान खान होते. याप्रसंगी प्रा. संजय मोरे यांनी आपल्या मनोगतात रमजानचे महत्व सांगितले. कार्यक्रमास प्रा. दिलीप सोनवणे, नथ्थु कोळी, नितीन सोनवणे, मुन्ना पिंजाणी, सरफराज खान, जगजिवन मोरे, मौलाना खान, करीम यासिम मणियार, सलमान खान, राकेश वराडे, स्वप्निल पाटील, सुधाकर पाटील, किरण कुरकुरे आदी हिंदू मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.