निंभोरा। येथे हनुमान नगरमध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विजय सोनार यांनी नरहरी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन केले. तसेच महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग तसेच त्यांचे विचार मांडले. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपण समाजाचे देणे लागतो याची जाणिव करुन दिली. रंजल्या गांजलेल्यांची सेवा करावी, असे आवाहन युवकांना केले.
कार्यक्रमास समाजबांधवांसह ग्रामस्थांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला विजय सोनार, मनोज सोनार, प्रमोद सोनार, रामेश्वर सोनार, तुषार सोनार, अमोल सोनार, अमोल गिरडे, गणेश तेली, आप्पा आंबेकर, मयुर दोडके, महेंद्र तेली, योगेश भोंगे, गजानन कोळी, दिपक कोळी, विजय महाजन, बापू कोळी, राजेंद्र महाजन, शाहरुख खान, दिपक विचवे, अभिषेक कोळी, गोविंदा जगताप यांसह असंख्य युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद सोनार यांनी तर आभार मनोज सोनार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बजरंग मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले.