निंभोरा येथे महिलांसाठी शौचालय बांधण्याची ग्रामस्थांची मागणी

0

निंभोरा : गावातील वार्ड क्रमांक 1 मध्ये दसनुर रस्त्याला लागून महिला शौचालय आहे. मात्र यात व्यवस्था कमी असल्याकारणाने महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवास असल्याने बौद्ध वस्ती, कोळी वाडा, दोडके वाडा, धनगर वाडा व इतर काही रहिवासी असल्याने शौचालयाचे आठ शौचालय कमी पडतात. यातील तीन आधीच बंद आहेत. याआधी मनसेने सुध्दा शौचालय बांधण्यात यावे, याकरीता निवेदन दिले होते. तरीसुध्दा निभोंरा ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे आरोप परिसरातील नागरिक करीत आहे. त्याआधी 2014-2015 मध्ये सुध्दा कोळी वाडा या परिसरातील नागरिकांनी अर्ज निभोंरा ग्रामपंचायतीकडे दिला होता. या शौचालयाचा त्रास गेल्या काही वर्षांपासून होत असून ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे व वॉर्ड क्रमांक 1 ला सावतर वागणूक करीत असल्याचे बोलले जात आहे. या परिसरात महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने महिलांना उघड्यावरच शौचास जावे लागते. निभोंरा ग्रामपंंचायतीने या परिसरात सार्वजनिक शौचालय 14 व्या वित्त आयोगातून 20 ते 25 शौचालय बांधावे अशी मागणी होत आहे.