निंभोरा। युवा रसिक मंडळातर्फे मराठी नववर्षाची पहाट भक्ति गीत आणि भावगीत सादर करुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गेल्या 10 ते 11 वर्षापासून येथील युवा रसिक मंडळ गुढी पाडव्याला सकाळी भव्य रांगोळी तसेच भक्ति गितांचा कार्यक्रम आयोजित करीत आहे.
यावर्षी खिर्डी येथील स्वरगंध म्यूझीकल ग्रुप ने ओंकार स्वरूपा, जय जय महाराष्ट्र माझा, शुर आम्ही सरदार अशी भावगीत आणि भक्तिगीत सादर करुन तसेच नरेंद्र गुरव यांनी नाकाने शहनाई वाजवून रासिकांना मंत्रमुग्ध केले. सावदा येथील सुरज बारी यांनी भक्तिगीत व भावगीत सादर केली. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेन्द्र नेहेते हे होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रायोजक दिलीप तंटु खाचणे व कुमुदिनी खाचणे यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन सुनील कोंडे यांनी तर प्रस्ताविक धीरज भंगाळे यांनी केले व आभार धीरज सपकाळे यांनी मानले.