निंभोरा येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

0

निंभोरा : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ नागरीक, महिलांचा सत्कार करुन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खिर्डी येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक बी.आर. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल कोंडे यांनी केले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, रावेर नगरराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी पंचायत समिती उपसभापती विजया पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, माजी सरपंच अमनखान पठाण, कडू भंगाळे, बी.आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्ञानदेव महाजन, पांडूरंग पाटील, चत्रभुज खाचणे, दगडू भारंबे, नितीन दोडके, मेहबूब मन्सुरी, सागर चौधरी, प्रकाश पाटील, विनोद तराळ, राहुल सोनार, सागर तायडे, स्वातंत्र्य सैनिक सुधाकर सोनवणे, ओंकार राणे, जवाहरलाल वानखेडे, गिरीश भंगाळे, गिरीश नेहेते, राजीव भोगे, ललित पाटील, जगदिश पाटील, हर्षल ठाकरे, रविंद्र पाटील, शेख इकबाल, अमोल गिरडे, सचिन पाटील उपस्थित होते. सुत्रसंचालन दिलीप सोनवणे यांनी तर आभार प्रल्हाद बोंडे यांनी मानले.