निंभोरा रेस्ट हाऊसजवळ अनोळखी इसमाचा मृत्यू

0

भुसावळ- तालुक्यातील निंभोरा बु.॥ दीपनगर रेस्ट हाऊसजवळील जुन्या विठ्ठल मंदिराच्या मोकळ्या जागेत 40 ते 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी पावणेनऊ वाजेपूर्वी आढळल्याने खळबळ उडाली. या इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? याबाबत निश्‍चित असे ठोस कारण कळू शकलेले नाही मात्र सर्पदंश झाल्याने कदाचित मृत्यू झाला असावा? अशी शक्यता तालुक्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांनी वर्तवली. मयताची दाढी मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याचे पायही पिवळे पडल्याचे सूत्रांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी निंभोरा पोलिस पाटील विजय मुरलीधर धांडे यांनी खबर दिल्यावरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय नजीर काझी करीत आहेत.