पालकमंत्र्यांकडे रस्त्यासाठी 75 लाखांची मागणी
रावेर- निंभोरा-विवरा या तीन किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने व या रस्त्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने निंभोरा येथील सुनील कोंडे व शेतकर्यांनी 31 रोजी लाक्षणिक उपोषण केले.
पं.स.सदस्य दीपक पाटील, सरपंच डिगंबर चौधरी, उपसरपंच सुभाष महाराज पाटील, प्रल्हाद बोंडे, चत्रभुज खाचणे, नरेंद्र ढाके, गुणवंत भंगाळे, रवींद्र भोगे, गिरीश नेहेते, सचिन चौधरी, मोहन भंगाळे, सागर चौधरी, राजीव भोगे, शेख दिलशा, दिलीप सोनवणे, योगेश कोळंंबे, किरण कोंडे, सुरेश भंगाळे, हेमराज पवार, विष्णू भिरुड, गोपाळ बर्हाटे, सुहास नेहेते, गणेश खाचणे, अमोल खाचणे, कमलाकर येवले यांच्यासह गावातील 150 शेतकरी उपस्थित होते.
आमदार हरीभाऊ जावळेंच्या शिष्टाईने उपोषण मागे
आमदार हरिभाऊ जावळे यांनी मुंबई येथे मंत्रालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे खास बाब म्हणून पाच रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मंजुरीचे पत्र दिले. पाटील यांनी सचिव स्तरावर आदेश देत रस्त्याच्या नुतनीकरणाबाबत पत्र दिले. सोबतच जिल्हा परिषद उपअभियंता सी.आर.चोपडेकर यांनी 70 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविल्याबाबतची प्रत देत सुनील कोंडे व सहकारी शेतकर्यांच्या उपोषणाची सांगता केली. उपोषणस्थळी जिल्हा परीषद उपअभियंता चोपडेकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या.