निंभोरा स्टेशन येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

0

निंभोरा । निंभोरा स्टेशन येथील बुध्दवासी गणपत रावजी तायडे व बुध्दवासी सराबाई गणपत तायडे यांच्या स्मरणार्थ निंभोरा बु. येथे डोळे तपासून गरजू रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच रक्तातील साखरेची तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

शिबिरात डोळ्यांचे डॉ. शैलेंद्र बर्‍हाटे साई नेत्रालय भुसावळ तसेच कविता कांबळे (कल्याण, मुंबई) हे असून त्यांना सहकार्य येथील डॉ. सुधाकर चौधरी यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक भिमराव तायडे, चंद्रकांत तायडे, नाना तायडे, गौतम तायडे, शकुंतला बोदवडे, कल्पना शिंदे यांनी केले आहे. शिबीर शनिवार 29 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान बौध्द विहार, जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेमागे, रेल्वे स्टेशन परिसर, निंभोरा येथे आहे.