निंभोरा- गावातील समाधान जिजाबराव चौधरी (38, रा.निंभोरा) यांचा स्वतःच्या शेतातील विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. 1 नोव्हेंबर रोजी पहाटे सात वाजेपूर्वी ही घटना घडली. दरम्यान शेतकर्याने आत्महत्या केली की अन्य कुठल्या कारणाने त्याचा मृत्यू झाला ? याबाबत निंभोरा पोलिसांकडून तपास सुरू आहे. निंभोरा शिवातील गट नंबर 370 मध्ये चौधरी यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास आढळला. या प्रकरणी सचिन कडू चौधरी (36, रा.निंभोरा) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक ज्ञानेश्वर चौधरी करीत आहेत.