निंभोर्‍यात तापी पुलावर ठिय्या तर वरणगाव शहर कडकडीत बंद

0

जलसमाधी आंदोलनाला प्रशासनाने नाकारली परवानगी : भुसावळसह रावेरात आज रास्ता रोको

भुसावळ- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सलग तिसर्‍या दिवशी आंदोलन सुरूच होते. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम येथे जलसमाधी आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर दिवसभर पदाधिकार्‍यांनी ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. शुक्रवारी रावेर शहरातील अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर मार्गावर तर भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीवर सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको करण्यात येणार आहे तसेच भुसावळ शहर बंदचीदेखील हाक देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुरुवारी सायंकाळी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांची बैठक घेत बंदोबस्ताच्या सूचना केल्या.

निंभोरासीम पुलाजवळ सहा तास ठिय्या
रावेर- जलसमाधी आंदोलनाच्या इशार्‍यानंतर निंभोरासीम पुलाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले तर जलसमाधी आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर गुरुवारी तब्बल सहा तास राज्य महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जलसमाधी आंदोलन करू नये, अशी विनंती प्रशासनाने केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना निवेदन देत दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

यांचा आंदोलनात सहभाग
मराठाला समाजाला आरक्षणाची मागणी करून घोषणा देऊन आंदोलनाला सुरुवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष योगेश महाजन, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील कोंडे, शिवसेना तालुकाप्रमुख योगीराज पाटील, विलास ताठे, विनोद पाटील (पातोंडी), घनश्याम पाटील यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हवालदार बेशुद्ध झाल्याने खळबळ
आंदोलनाला सुरक्षा पुरवणारे राज्य राखीव दलातील हवालदार सी.एन.पवार अचानक चक्कर येऊन पडल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली. पोीस कर्मचार्‍यांनी लागलीच त्यांना घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेद्वारे रावेर हलवले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगिलते.

आपत्ती व्यवस्थापनासह पट्टीच्या पोहणार्‍यांकडून गस्त
निंभोरासीम तापी नदीच्या पुलाच्याखाली जलपात्रात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नरवीरसिंग रावळ आपल्या दहा जणांच्या टीम सोबत पात्रात गस्त घालत होते तर रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी खाजगी चार नावा तैनात करीत पट्टीच्या पोहणार्‍या 30 जणांवर ट्यूबवर बसणार्‍यांनीही नदीपात्रात गस्त घातली. आंदोलनाच्या पूर्वसंध्येला तापी नदीपात्रात स्वत: तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी बोटी द्वारे जाऊन तापी नदीच्या जलस्तराची माहिती घेऊन पाहणी केली.

तापी नदीच्या पुलाला छावणीचे स्वरूप
मराठा क्रांती मोर्चाचे जलसमाधी आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पुलावर लावण्यात आला. रावेर उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, मुक्ताईनगर उपअधीक्षक सुभाष नेवे, रावेर पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, मुक्ताईनगर निरीक्षक अशोक कडलग यांच्यासह सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक119 पोलिस कर्मचारी, एक आरसीपी प्लाटुन, दोन एसआरपी प्लाटूचा तगडा पोलिस बंदोबस्त होत्या त्यामुळे पुलावर छावणीचे स्वरूप आले होते.

पाच बस फेर्‍या रद्द
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एस.टी.महामंडळाने विशेष काळजी घेतली होती. रावेर-मुक्ताईनगर, रावेर-अंतुर्लीच्या बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या तर या रस्त्यावरील ट्रॅफीक इतर ठिकाणावरून वळविण्यात आली होती. जागेवर रुग्णवाहिकेसोबत वैद्यकीय अधिकारी, अग्निशामक दल तळ ठोकून होते.

पुलाच्या दोन किलोमीटर आधीपासून वाहनांची चौकशी
मराठा क्रांती मोर्चाची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेतली. निंभोरासीम तापी-नदीच्या पुलापासून दोन किलोमीर अंतरापर्यंत रस्ता ब्लॉक करण्यात आला. येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात आली. आंदोलनकर्त्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेण्यात येत होती.

मराठा समाज आरक्षण : वरणगाव शहर शंभर टक्के बंद

वरणगाव- मराठा समाज आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून गुरुवारी शहर बंदची हाक सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली. व्यावसायीकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. वरणगाव बसस्थानक चौकात सकाळी 10 वाजता कायगाव, ता.गंगापूर येथील स्व.काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजातील ज्येष्ठ सोनवणे गुरुजी व सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

घोषणांनी शहर दणाणले
समाजबांधवानी पायी मोर्चा काढत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत प्रचंड घोषणाबाजी केली. वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक चौक, फुले मार्केट, गांधी चौक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला तर सायंकाळी पाच नंतर तुरळक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग
संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, पंकज पाटील, संतोष शेळके, वाय.आर पाटील, मनोज देशमुख , अमोल पाटील, शोभराज शेळके, सदाशीव पाटील, संभाजी देशमुख, सुनील काळे, मिलिंद मेढे, रिंकू सोनवणे, राजेंद्र चौधरी, जगन्नाथ आढाव, नितीन मराठे, नितीन पाटील, शिवाजी पाटील, गजानन पाटील, मिलिंद पाटील, अतुल शेटे, नामदेव पाटील, प्रेमनाथ भोसले, महेश पाटील, समाधान पाटील, सुनील पाटील, बंडू पाटील, वैभव देशमुख, रवींद्र पाटील, शशीकांत पाटील, दीपक देशमुख, प्रशांत निंबाळकर, संजय निंबाळकर, अमोल देशमुख, प्रकाश मराठे, तुषार गांवडे, दीपक चौधरी, पंकज देशमुख, विक्की देशमुख, गोटू देशमुख, संतोष मराठे, निलेश पाटील आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, हवालदार नागेश तायडे, राहुल येवले, दत्तात्रय कुळकर्णी, महेंद्र शिंगारे, रेशमा मिरगे, वाहतूक पोलिस निकम आदींनी चोख बंदोबस्त राखला.