निंभोरा बु.॥- वाळू चोरी करणार्या चौघांविरुद्ध निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी निलेश रमेश चौधरी (रा.रावेर) यांच्या फिर्यादिवरून नारायण प्रकाश सवर्णे, गिरधर भिका सवर्णे, शरद बाबुराव सवर्णे (तिघे रा.निंभोरासीम), मोहन भागवत पाटील (रा.विटवा) यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाळू चोरी होत असताना फिर्यादीने थांबवल्यानंतर आरोपींनी आत्महत्या करूण घेऊ, अशी धमकी देत पळ काढला. दोन ट्रॅक्टर व त्यातील वाळू निंभोरा पोलिसात जप्त करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मेहमूद शहा करीत आहेत.