निंभोरा- शेत शिवारात गट नं.842 शेताच्या विहिरीत एक अनोळखी पुरूष जातीच्या व 21 वर्षीय ईसमाचा 13 रोजी दुपारी 1.10 वाजेपूर्वी मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून हा ईसम पाण्यात असल्याने पाण्यात मृतदेह कुजल्याने ओळख पटू शकली नाही. निंभोरा पोलीस ठाण्यात पंकज कमलाकर चौधरी (निंभोरा) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे व सहकारी करीत आहे.