विवरे: वडगाव जवळील निंभोर्या फाट्यावर आयशर (एम.एच.20 सी.टी.6865) ने दुचाकी (एम.एच.19 बी.वाय.1970) ला धडक दिल्याने खानापूर येथील वायरमन रवींद्र गोविंदा पाटील (30, बोरखेडा, ह.मु.खानापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर निंभोर्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, एएसआय कुलकर्णी, विश्वास चव्हाण व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आयशर चालक पसार झाला तर रात्री उशिरा निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.