धुळे : शहराच्या काही अंतरावर असलेल्या मोहाडी उपनगरातील निकिता गावडे या युवतीच्या मृत्यू प्रकरणी आज मोहाडी उपनगरातील ग्रामस्थान कडून मोर्चा काढण्यात आला होता. संपूर्ण मोहाडी गावातून लक्षणीय संख्या मोर्चा मध्ये सामील झाली होती. पोलीसांनी चौघा संशयीतांना ताब्यात घेतले असून या संशयीतांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मोहाडी उपनगरातून मुकमोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन देण्यात आले. याबाबत प्रशासनाने ग्रामस्थान सोबत चर्चा केली असता. मयत निकिता गावडे प्रकरणात कठोर चौकशी करण्याचे आश्वासन या वेळी उपस्थितांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना दिलेल्या निवेदनात सकाळी क्लासला जात असल्याचे सांगून घरुन निघालेली निकिता विठ्ठल गावडे ही (17) वर्षीय युवती दुसर्या दिवशी विहीरीत मृतावस्थेत आढळली. तीच्यासोबत काहीतरी अघटीत घडले असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
नातलगासह परिवार सहभागी
मोहाडी उपनगरातील मयत निकिता गावडे हिच्या घरापासून निघालेल्या या मुकमोर्चात निकिताच्या परिवारातील लोकांसह नातलग व शेकडो नागरीक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.जिल्हा प्रशासनाला दिलेल्या या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, शहराचे आमदार अनिल गोटे, जिल्हा पोलिस अधिक्षक आणि नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनाही पाठविण्यात आले आहे.
मयत निकिताने आत्महत्या केली – शिंदे
निकिता गावडे हिने आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येची चौकशी पोलिस प्रशासनाने करावी. तसेच आत्महत्येस दोषी असलेल्या खर्या गुन्हेगारांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी माजी नगरसेवक विनायक शिंदे यांनी देखील प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, निकिताच्या आत्महत्येनंतर ताब्यात घेतलेल्या चारही मुलांचा युवतीच्या आत्महत्येशी काही संबंध नाही. हि घटना पोलीस तपासातून समोर येईल. या घटनेची पोलिस प्रशासनाने कसून चौकशी करावी. तसेच ज्या विहिरीत युवतीचा मृतदेह आढळला त्यापासून काही अंतरावर तिची दुचाकी होती. दुचाकीची चावी युवतीकडे आढळून आली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी. केवळ फोन केला म्हणून आत्महत्या होत असेल तर या पुढे फोन करणार कोण? असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
दोषी विरोधात जलद न्यायालयात खटला चालवण्याची मागणी
पहाटे 3.55 वाजता तीला शुभम शरद पाटील याचा फोन आला होता. या दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले याचा शोध घेण्यात यावा. निकिता गावडे हिला आकाश शिंदे आणि त्याच्या तीन मित्रांनी धमकी दिल्याचे सनी शिंदे यांनी चौकशीत सांगीतले आहे. त्यामुळे निकिता आणि सनी शिंदे यांच्यातील मैत्रीची होती. दि.12 डिसेंबर रोजी शुभम शरद पाटील आणि निकिता गावडे यांच्यात झालेल्या फोन संभाषण व मेसेज देवाण-घेवाण झाले होते. आकाश शिंदे व शुभम पाटील यांच्यात गेल्या महिनाभरात झालेल्या फोन संभाषणासहमेसेज, व्हॉट्सअॅप मॅसेज, फेसबुक मॅसेज याचीही चौकशी व्हावी. मयत निकिता सोबत नेमेके काय झाले घातपात रात्री झाला असेल तर ती दिवसभर कुठे आणि कुणासोबत होती. याची चौकशी संशयीतांकडे करावी. तसेच या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करुन त्यांच्याविरुध्द जलद न्यायालयात खटला चालवून कडक शासन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.