वरणगाव। सुरुवातीपासूनच शहरात पालिका स्थरावरून विकास कामांनी उच्चांक गाठला असून सर्वच बांधकामे निकृष्ठ दर्जेचे व एकाच ठेकेदाराला कामे का दिली जातात असा आरोप करून सर्व कामांची चौकशीची मागणी येथील कॉग्रेस आय कमेटीचे शहर अध्यक्ष ऐहतेशामाद्दीन काझी यांनी मंगळवार 11 रोजी सकाळी 11 वाजता पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालिका निर्मितीपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये पालिकेच्या माध्यमातून कोटीच्यावर विकासकामे सुरू आहे. या बांधकामध्ये कॉकेट रस्ते, फेवर ब्लॉक, गटारी, सार्वजनीक शौचालय, अंडरग्राऊंड गटारी, नाल्यावर पुलांचे बांधकामे, ढापे आदी कामे निकृष्ठ दर्जाची
सुरु आहे.
सर्व कामे एकाच ठेकेदाराच्या नावावर का?
तसेच सर्वच कामे एकाच ठेकेदाराच्या नावावर का, असा आरोप कॉग्रेस आय कमेटीचे वरणगाव शहराचे अध्यक्ष ऐहतेशामोद्दीन काझी, राजेन्द्र पालीकर, प्रशांत पाटील, एन.व्ही. देशमुख, फिरोज शेख, लुकमान शाहा, तनवीर कुरेशी, नईमोद्दीन काझी आदींनी पालिकेचे सुरू असलेले बांधकामे व ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे.
ठेकेदारावर केला आरोप
तसेच निवेदनात म्हटले आहे की, ठेकेदार आपले निकृष्ठ दर्जाचे बांधकामे वाचविण्यासाठी सर्वांना टक्केवारीचा हिशोब करीत असल्याचा देखील आरोप केला आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत आहे. त्यामुळे झालेली विकासकामे नागरीकांच्या हितासाठी का? टक्केवारीसाठी? असाही आरोप लेखी निवेदनात म्हटले आहे.
चौकशीचा बळगा उगारावा
पालिकेने सर्वस्वी कामांवर चौकशीचा बळगा उगारावा अन्यथा अहिसांच्या मार्गाने आंदोलने उपोषण, धरणे, मोर्चे अवलंबवावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. वरणगाव पालिकेने चालू केलेली कामे हे निकृष्ट दर्जाची करत असल्याचे आरोप शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्यांच्या केली आहे. ती कामे निकृष्ट असल्याने काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी मुख्याधिकार्यांना निवेदनद्वारे कळविले आहे. कामाचा दर्जा नसेल तर लाक्षणिक उपोषणे, रास्तारोको आंदोलन पालिकेसमोर करण्याचा काँग्रेस पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना इशारा दिला आहे.