निकृष्ट रेती आढळल्यास कारवाई करून बिले रोखणार

0

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्‍वासनानंतर ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण मागे

सावदा- मोठे वाघोदा येथील बसस्थानक परीसरात 43 लाख 10 हजार रुपये खर्चून राज्य मार्ग क्रमांक चारवर पुर्नबांधणी होत असलेल्या पुलाच्या बांधकामात संबंधीत ठेकेदार इस्टिमेट व प्रमाणकानुसार बांधकाम साहित्य न वापरता माती मिश्रीत वाळू (भिंगीरेती), कच्चा मुरूम व खडीचा बारीक कच (चुराडा) वापरून बांधकाम करीत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य मुबारक तडवी यांनी केली होती या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी मंगळवार, 5 पासून सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेख, बाविस्कर यांच्यासह इतर अधिकार्‍यांनी उपोषणार्थींची भेट घेत उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही व्हावी, काम थांबविण्यात यावे, त्यांची बिले अदा करण्यात येऊ नये, असे लेखी आश्वासन द्यावी, अशी मागणी मुबारक तडवी यांनी केली. ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करू तसेच कामात निकृष्ट रेतीचा वापर होणार नाही, झाला असल्यास बिले रोखण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.