निकृष्ठ पोषण आहारामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात

0

नवापूर। तालुक्यातील बोकळझर येथील अंगणवाडील बालकांना पोषण आहारात वाटप करण्यात येणार्‍या पोषण आहाराच्या शेवाई पाकिटात दुर्गंधी व बुरशीयुक्त शेवाळया निघाल्याने आदिवासीबहुल भागातील बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही घटना अंगणवाडीतील सेविकांच्या निदर्शनास आल्याने गावातील सरपंच राहूल गावित यांना सांगितले कळविण्यात आले. सरपंच व गावकरी यांनी नवापूर पंचायत समितीत धाव घेतली तेथील उपसभापती दिलीप गावित यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी संबंधीत घटनेचा पंचनामा केला. या पाकिटांचा वाटप करण्यात येवू नये व पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

आदिवासी भागातील प्रकार असल्याने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यानंतर नवापूर तालुक्यात बुरशीयुक्त शेवाळ्या (मॅगी) प्रकरण प्रकाश झोतात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात ही परिस्थिती राहिल्यास भविष्यात अंगणवाडीतील बालकांना विष बाधा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत दोन भागातील अंगणवाडी वर्गातील मुलांना महिन्यासाठी पोषण आहार दिला जातो. बोकळझर येथे अंगणवाडीत पोष्टीक शेवाईचे पाकीट (मॅगी) विद्यार्थ्यांना सकाळी दिले जाते. पंचायत समिती उपसभापती दिलीप गावित व सरपंच यांनी ही पाकिटे तपासली असता बुरशीयुक्त शेवाई आढळून आली.