ॲकापुल्को (मेक्सिको) – जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला मेक्सिको खुल्या टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस याने मेक्सिको ओपन स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद केली. निक कुर्यिगासने जोकोव्हिचचा पहिल्यांदाच सामना करताना ७-६ (११/९), ७-५ असा विजय मिळवून धक्कादायक निकाल नोंदवला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेतील उपविजेत्या राफेल नदालने योशिहिटो निशिओकावर सरळ सेटमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुढील फेरीत अमेरिकेच्या सॅम क्युरीचे आव्हान
या दोघांमधील ही आजपर्यंतची पहिलीच लढत होती. ऑस्ट्रेलियाच्या २१ वर्षीय किर्गिओस याने आपल्या ताकदवान सर्व्हिसने सातत्याने जोकोविचवर दडपण ठेवले. त्याने सामन्यात २१ बिनतोड सर्व्हिस करून जोकोविचला संधीच दिली नाही. किर्गिओसने आपल्या फर्स्ट सर्व्हिसवर ८१ टक्के यश मिळविले. ही लढत १ तास ४७ मिनिटे चालली. उपांत्य फेरीत आता त्याची गाठ सॅम क्युरेशी पडणार आहे. दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर जोकोव्हिच पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र उपांत्यपूर्व फेरीतील या लढतीत एक तास ४७ मिनिटांच्या संघर्षांनंतर त्याला पराभव पत्करावा लागला. पुढील फेरीत कुर्यिगासला अमेरिकेच्या सॅम क्युरीचे आव्हान पेलावे लागणार आहे. दुसऱ्या लढतीत नदालने दमदार खेळ करताना निशिओकावर ७-६ (७/२), ६-३ असा विजय मिळवला. ‘‘तो फार जलद होता. त्याचे आक्रमण थोपवण्यासाठी मला योग्य फटक्यांची निवड करावी लागली. त्यामुळे लयबद्ध खेळ करणे आव्हानात्मक होत होते,’’ असे नदाल म्हणाला. उपांत्य फेरीत नदालसमोर मारिन चिलीचचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला नदाल सलग १३ सामन्यांत अपराजित आहे. विजयानंतर किर्गिओस म्हणाला, ‘‘हा मोठा विजय आहे. जोकोविचशी माझा पहिलाच सामना होता. त्यामुळे मी काहिसा दडपणाखाली होतो. पण, पूर्ण आत्मविश्वासाने खेळलो. माझ्या विजयात सर्व्हिस निर्णायक ठरली. माझ्यामते इतकी अचूक सर्व्हिस प्रथमच झाली असावी.’’