निक लग्नासाठी मुंबईला रवाना

0

मुंबई : नुकताच ‘दीपवीर’चा विवाहसोहळा पार पडला. आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचा नंबर आला आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास येत्या २ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर हे पाच दिवस त्यांचा विवाहसोहळा होणार आहे. जोधपूरच्या उमैद भवनमध्ये प्रियांका-निकचा विवाहसोहळा होणार आहे. त्यासाठी निक न्यूयॉर्कहून मुंबईसाठी रवाना झाला आहे.

त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो विमानात बसलेला दिसत आहे. न्यूयॉर्कचा निरोप घेऊन तो मुंबईला रवाना झाल्याचे त्याने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे.