भुसावळ : गस्तीदरम्यान पोलिस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी निखील राजपूत यास सोमवारी सकाळी श्रीराम नगरातील राहत्या घरातून बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. संशयीताला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी ओळख परेडसाठी पोलिस कोठडीचे हक्क राखून ठेवत 10 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी न्यायालयात केली असता न्यायालयाने ती मान्य केली.
16 गुन्हे दाखल
27 नोव्हेंबर रोजी बाजारपेठचे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश घायतड व सहकारी गस्तीवर असताना संशयीत निखील राजपूतसह टोळीने मारहाण करीत धक्काबुक्की केली होती. गुन्हा घडल्यानंतर संशयीत पसार झाला होता तर या गुन्ह्यात पाच संशयीतांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी राहत्या घरातून आरोपी निखील राजपूत यास पोलिसांनी अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करीत पोलिस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तपास सहा.पोलिस निरीक्षक हरीष भोये पुढील तपास करीत आहे.