निगडीत तडीपार गुंडास अटक

0

निगडी : निगडी पोलिसांनी गस्त घालत असताना एका तडीपार गुंडास अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री आकुर्डी येथे करण्यात आली. विकी पोपट वाघ (वय 20, रा. पंचतारानगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.

सापळा रचून अटक
विकी वाघ याला पुणे आणि परिसरातून तडीपार करण्यात आले होते. मंगळवारी रात्री निगडी पोलीस गस्त घालत असताना तो आढळून आला. पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. वाघ याला 7 जून 2017 ते 7 डिसेंबर 2018 पर्यंत तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश असतानादेखील तो परिसरात वावरताना आढळून आला. निगडी पोलीस तपास करत आहेत.