निगडीत 11 फेब्रुवारीला अर्ध मॅरेथॉन

0

पिंपरी (प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेच्यावतीने 11 फेब्रुवारी रोजी प्राधिकरण येथे आठव्या रनेथॉन ऑफ होप 20182 या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हेमंत कुलकर्णी यांनी शनिवारी (दि.27) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष विजय काळभोर, हॉटेल हिलटनचे व्यवस्थापक आदित्य समशेर मल्ला, डॉ. सजय देवधर, रवी राजापूरकर, अरविंद खांडकर, सुनिल जेजुरीकर, सुधीर मित्रा आदी उपस्थित होते.

पावणेसहा वाजता मॅरेथॉन सुरु होणार
ही मॅरेथॉन महाराष्ट्र ऍथलेटिक असोसिएशनचा उपक्रम असून, निगडी प्राधिकरणातील संत तुकाराम उद्यानाशेजारील मैदानावरून सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात होईन. यात एकाच दिवशी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती होणार आहेत. मुले- मुली तसेच स्त्री-पुरूष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात स्पर्धा पार पडेल. 18 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयोगटांसाठी 21 किमी आणि 10 किमी आणि 5 किमी पेक्षा जास्त तर 14 ते 16 वयोगटासाठी 3 किमी अंतराची स्पर्धा होणार आहेत. याशिवाय अन्य स्पर्धाही होणार आहेत. यामध्ये 5 किमीची स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असणार आहे. तसेच 2 किमीची धर्मादाय स्पर्धा उद्योगक्षेत्रासाठी असणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी डॉ. प्रवीण घाणेगावकर यांच्याशी 9823882251 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.