जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; फोटोवरून संशयीताचा लागला शोध
पिंपरी- बंगल्याच्या दरवाजाचे लॅच उचकटून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा 97 लाखांचा ऐवज चोरल्याची घटना निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाजवळ सकाळी रविवारी घडली होती. या बंगल्यात काम करणार्या नोकरानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्यानंतर आरोपी डाऊन पुष्पक एक्स्प्रेसने पसार होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने खंडवा येथून आरोपीच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या. गोविंद परीहार (वय 35, रा. नेपाळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे
घर मालक गावी जाताच साधली संधी
निगडीतील घरमालक विनोद बन्सल (रा. निगडी) व कुटुंबीय नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत रखलवालदार गोविंद परीहारने संधी साधली. शनिवारी रात्री घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा उठवित त्याने बन्सल यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे लॅच तोडले. घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 80 लाख रुपये किंमतीचे दागिने आणि 17 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन तो पसार झाला. रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
फोटोवरून लागला आरोपीचा तपास
निगडी पोलिसांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांना आरोपीचे छायाचित्र पाठवले व संशयीत पुषपक एक्स्प्रेसने पसार होत असल्याची माहिती दिली मात्र एव्हाना दुपारी गाडीने जळगाव स्थानक सोडल्याने भुसावळ स्थानकावर अलर्ट जाहीर करण्यात आला मात्र आरोपीचा शोध लागला शकला नाही तर काही अधिकारी गाडीतच आरोपीचा शोध घेत होते. या नंतर गाडीला खंडवा थांबा असल्याने तेथेही अलर्ट जाहीर केल्यानंतर खंडवा रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी सायंकाळी उशीरा खंडवा-ईटारसीदरम्यान आरोपीच्या मुसक्या आवळल्या.