पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यांतच निगडीपर्यंत नेण्यात यावी आणि श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना यासाठी महापालिकेत एक खिडकी योजना सुरु करण्याची मागणी उपमहापौर शैलजा मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पहिल्या टप्यात पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित असून त्याचे काम देखील सुरु आहे. परंतु, पुणे मेट्रोची निगडीपर्यंत आवश्यकता आहे.पिंपरीपुढे निगडीपर्यंत शहरात अनेक नामवंत शैक्षणिक संस्था, औद्योगिक कंपन्या, रुग्णालये, आयटीपार्क, एमआयडीसी सारख्या संस्था आहेत. तसेच निगडीपर्यंत प्रवाशांची संख्या देखील जास्त असतेअसे निवेदनात म्हटले आहे.