निगडी : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 45 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आकाश ऊर्फ पिंटू उर्फ बुटासिंग प्रकाश साळवे (वय. 23 रा. तळेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार किशोर बबन पढेर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
हे देखील वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील आंध्रा बँकेच्या समोरील रोडवर एक तरुण संशयास्पद उभा असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार निगडी पोलिसांनी सापळा रचून आकाश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी आकाश विरोधात भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलीस अधिनिमान्वये गुन्हा दाखल करून 45 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे तपास करीत आहेत.