निगडी-दापोडी बीआरटी रद्द करा

0

पिंपरी-चिंचवड : ‘अनेक तज्ज्ञांनी बीआरटी मार्गासाठी सुचविलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत मर्ज इन, मर्ज आऊट प्रशासनाच्या केलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच दिसत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता व तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत हा प्रकल्प का राबवित आहात, याचा खुलासा करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अपघात वाढण्याची शक्यता
निगडी ते दापोडी साडेबारा किलोमीटर लांबीच्या मार्गावर महापालिकेच्या वतीने बीआरटी प्रकल्प राबवला जात आहे. मात्र, बस थांब्यावर ज्येष्ठ नागरिक, अपंग, अंध यांना पोहचणे धोकादायक आहे. अनेक तज्ज्ञांनी अपघातांचे प्रमाण कसे वाढेल यांचा सचित्र अहवाल दिला आहे. आयआयटी, पवईच्या सूचनांचे पालन झालेले दिसत नाही. महापालिका हद्दीतून जाताना बीआरटी मार्ग रस्त्याच्या एका बाजूने करावा किंवा बीआरटी मार्ग रद्द करावा, अशी मागणी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, अरुण मुसळे, सचिन काळे, सतीश लालबिगे, सदाशिव जाधव यांनी केली आहे.