रावेत : सदैव सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांना कोणताही सण किंवा उत्सव कुटुंबीयांसोबत साजरा करता येत नाही. ज्यावेळी सर्वसामान्य नागरिक सण साजरा करतात; त्यावेळी सर्वसामान्यांचा हाच उत्साह अबाधित रहावा, म्हणून पोलीस त्यावेळी आपले कर्तव्य बजावत असतात. पोलिसांची हीच कर्तव्य भावना ओळखून त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस मित्र संघटनेतर्फे निगडी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड पोलीस मित्र संघटनेचे शहराध्यक्ष गजानन चिंचवडे, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग अवताडे, संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गोपाल बिरारी, कविता हिंगे, योगेश आचार्य, सचिन खरमाळे, तानाजी मेंगुळकर, मोनिका शर्मा, शुभम चिंचवडे, सागर भिवडीकर उपस्थित होते.
महिलांनी बांधल्या राख्या
पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना याप्रसंगी महिलांनी राख्या बांधल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना गजानन चिंचवडे म्हणाले की, पोलिसांना चोवीस तास सजग रहावे लागते. पोलिसांची ही कर्तव्य भावना ओळखून पिंपरी-चिंचवड शहर पोलीस मित्र संघटनेच्या वतीने निगडी पोलीस ठाण्यामध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.