निगडी पोलीस ठाण्यावर ‘बाटली मोर्चा’

0

पिंपरी-चिंचवड :- अपना वतन संघटनेच्या वतीने शहरामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात निगडी पोलीस ठाण्यावर “बाटली मोर्चा” काढण्यात आला. यावेळी अवैध दारू धंदे बंद करा, हफ्तेवसुली करणा-या पोलिसांवर कारवाई करा, गुन्हेगारी थांबवा अशा घोषणा देत अंकुश चौक ते निगडी पोलीस स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यांनी निगडी पोलीस ठाण्याच्या स्टेशनच्या हद्दीतील सर्व अवैध दारू धंदे बंद केल्याचे सांगितले. काही ठिकाणी जर अवैध धंदे निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे. आम्ही तात्काळ कारवाई करू, असे लेखी आश्वासन दिले.