भव्य पोवाडा गायन स्पर्धा
आकुर्डी : सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने बुधवार, दिनांक 06 फेब्रुवारी 2019 रोजी भव्य बालशाहीर पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, सेक्टर नंबर 25, निगडी प्राधिकरण येथे सकाळी 9:00 वाजता स्पर्धेचा प्रारंभ होईल. इयत्ता पाचवी ते दहावी या गटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून संघामध्ये मुख्य शाहीर आणि इतर पाच साथीदार सहभाग घेऊ शकतात.
संयोजकांच्या वतीने प्रत्येक संघाला संवादिनी आणि ढोलकी उपलब्ध करून दिली जाईल. सादरीकरणासाठी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केलेला असून ऐतिहासिक, सामाजिक अथवा राष्ट्रीय प्रबोधन या पैकी कोणत्याही एका विषयावरील पोवाड्याचा समावेश असावा. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी 31 जानेवारी 2019 पूर्वी करणे आवश्यक आहे. स्पर्धा संपल्यानंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ होणार असून त्यात विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये 5000/- आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक रुपये 3000/- आणि स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक रुपये 1500/- आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.
याशिवाय स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. नाव नोंदणीसाठी शाहीर प्रकाश ढवळे, प्लाट नंबर 299, सेक्टर नंबर 27, निगडी प्राधिकरण, पुणे – 411 044. या पत्त्यावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9552586689 वर सकाळी 9:00 ते 11:30 आणि सायंकाळी 5:30 ते 7:00 या वेळेत संपर्क साधावा.