निघोजेमध्ये केले वृक्षारोपण

0

चिंबळीः निघोजे ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी व्ही. एल. गाडिलकर यांनी सांगतिले. राज्य शासनाने 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला आहे. वाढते तापमान आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांनी सरकारची वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन उपसंरपच आशिष येळवंडे यांनी केले. ग्रामपंचायतीच्यावतीने विविध ठिकाणी आंबा, चिकू, पेरू इत्यादी झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 400 रोपांचे वाटप सरपंच रमेश गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले.