निजामपुर। साक्री तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायत दप्तर तपासणीसाठी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रुटिंग चेकिंगसाठी गेले होते. दरम्यान ग्रामपंचायतीच्या कारभारात त्रुटी आढळल्यामुळे येथील ग्रामसेवक व्ही आर. नावनकर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गांगाथर डी यांनी निलंबित केले आहे.
तपासणीकामी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सहाय्यक पाटील आदी उपस्थित होते. जवळपास एक तास तपासणी केल्यानंतर कामात दिरंगाई, अपुर्ण काम आढळून आल्याने तसेच अपूर्ण दप्तर असल्यामुळे दप्तर ताब्यात घेवुन सोबत नेले. नंतर लगेच तडका फडकी ग्रामसेवक नवानकर यांना निलंबित करण्यात आले. याबाबत जिल्हा प्रतिनिधी यांनी जिल्हा परिषद माहिती घेता याबाबत जिल्हा प्रशासनाने दुजारा दिला आहे. आज निलंबनाचा आदेश देणार असलयाचे समजते. निजामपुर गावात नेमक्या कोणत्या कारणाने निलंबित करण्यात आले याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. निजामपूर गामपंचायतीत कोणत्या कारणाने निलंबित ग्राम विकास अधिकारी यांनी निलंबित करण्यात आली जिल्हा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी होत आहे.
वैद्यकीय तपासणी कॅम्पची पाहणी
निजामपुर जैताणे येथे व बीपीएल जेष्ठ नागरिक वैघकीय तपासणी कॅम्पला भेट देऊन पाहणी केली. यानंतर निजामपूर ग्रामपंचायतीला आचानक भेट देवुन कामाची पाहणी केली. दप्तर तपासणी ग्राम विकास अधिकारी नवानकरकडून करुन घेत होते परंतु कामात चुका अपुर्ण दप्तर व कामात दिरंगाई असल्याचे निदर्शनास आल्याने व तपासणी करतांना ग्रामविकास अधिकारचे घाम निघत होते व अपुर्ण दप्तर असल्याने सी ई ओ गंगाथरण यांनी दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेतले.