निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिररातील निजामपुर येथील महेंद भटू भावसार यांची स्नुषा असलेल्या वंदना भावसार व पुष्पा पटेल या दोघीनी सायकलीच्या सहाय्याने 23 जुलै रविवार रोजी हिमालय प्रदेशातील समुद्र सपाटीपासुन 18380 फुट उंच असलेले खारडुंगला पास सर केले. जगाचा सध्याचा चिंतेचा विषय असलेल्या गलोबल वाँमिग जनजागृती मिशनअंतर्गत त्यांनी हे खडतर अंतर पार केले आहे. वंदना भावसार व पुष्पा पटेल यानी 12 जुलैला हिमालय प्रदेशातील मनालीपासुन ग्लोबल वाँमिग प्रचार व पसार करण्यासाठी मनाली ते लेह प्रवास सायकलीने सुरू केला.
11 दिवसात 520 कि.मी.सायकलने प्रवास
रोहतांग पास बरलाचला लाचुनगला घाटा लुपस नाकीला पास करुण टँगलाँगला 17582 फुट यापमाणे पाच घाट पार केले पुढे गेले खारङुगला टाँप पर्यंत 23 जुलै रोजी चिकाटीने जिद्दिने कठीण प्रवास करून या दोन्ही महिलांनी शिखर गाठले. शिखर गाठण्यासाठी 11 दिवस सायकली प्रवास केला. याठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. पाऊस व मोठ्या प्रमाणात थंडी होती. गार वारे झेलत त्यांनी जनजागृती मिशन पुर्ण केले. यामुळे दोघांचे कौतुक निजामपुर होत आहे. वंदना भावसार व त्यांची मैत्रीण पुषपा पटेल यांनी 11दिवसात 520 कि मी सायकल ने जनजागृती प्रवास केला.