निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर गावात लोकसेवा वेलफेअर फाउंड़ेशन जैताणे निजामपुर यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षरोपण निजामपुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार रघुवीर खारकर, ताहीरबेगमिरजा फाऊंड़ेशनचे अध्यक्ष रफीक शेख, अबरार शेख, सैयद जावीद शेख, अबदुलासर शहाबोदीन शेख युसुफसैयद आदी उपस्थित होते.
जातीय सलोख्याचे झाले दर्शन
महाराष्ट्र शासनाने राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांत विविध ठिकाणी वुक्षारोपण करण्यात आले. यावेळी अॅग्लो उर्दू हायस्कूल व जिल्हा परिषद उर्दू शाळा जैताणे येथे करणयात आले. यावेळी सपोनि राहुल पवार यांनी वृक्षारोपणाद्वारे जातीय सलोख्याचे दर्शन आहे. मुलांना एक झाड़े लावावे असे आवाहन करणयात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सततचा दुष्काळ पडण्याचा व अनियमित पावसाला एकमेव कारण म्हणजे दिवसेंदिवस नष्ट होत असलेली वनराई व झाडे असुन भाविष्य सुखमय करायचा असेल आणि भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा असे सांगत त्यांनी एक मुलं एक झाडे लावण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नासीर खान, मौसिन शाह साबीर शेख, रिजवान सिकलीगर ,लोकसेवा वेलफेअर फाउंड़ेशन पदाधिकारी उपस्थितीत होते.