निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर जैताणे येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने मेंढ्याच्या कळपावर हल्ला चढवला. दरम्यान या हल्ल्यात 25 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून तीन मेंढ्या जबर जखमी झाल्या आहेत. गावालागत राहत असलेल्या मेंढपाळ दिपक राजु भील यांच्या वाड्यावर 28 जुलै रात्री सुमारे 1 ते 3 वाजेच्या दरम्यान लंडग्यांनी मेंढ्यावर हल्ला करुन 50 पैकी 25 मेंढ्या मारून टाकल्या तर 3 मेढ्या गंभीर जखमी करून टाकल्या आहेत. दरम्यान यांची माहीती मिळताच पशु वैघकीय आधिकारि डॉ. गावित जैताणे, तलाठी रोजगावकर, वन खात्याचे वनरक्षक सोनवणे, ग्राम विकास अधिकारी योगेश सोनवणे आदिनी घटना स्थळी येवुन पंचनामा केला. मृत मेंढ्यांची किंमत सरासरी ठरवुन एकूण 2 लाख 80 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामा केला आहे. हा पंचनामा भरपाईसाठी शासनाकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिपक राजु भिल यांनी त्यांच्याकडील बोकड, बकर्या विकून मेंढ्या घेतल्या होत्या. या 50 मेंढ्यापैंकी 25 मेंढ्या लांडग्यांनी मारून टाकल्याने दिपक भिल यांना रडू कोसळले.
बोकड्या,बकर्या विकुन मेंढ्या घेतले होते. 50 मेंढ्यांपैकी 28 मेढ्या गेल्या 22मेंढया आहे माझे एकमेव रोजगाराचे साधन होते शासनाने भरपाई लवकर मिळवुन दयावी किवा भरपाई म्हणून मला 28 मेंढ्या द्याव्या.
-दिपक राजु भील,मेंढपाळ