निजामपुर आदिवासी भागात नविन सार्वजनिक शौचालय करा

0

निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर ग्रामपंचायत हद्दीतील वारड क्र 1 मध्ये जुनी भिलाटी येथे आदिवासी महिलांसाठी नविन शौचालयांचे बांधकाम करा अशी मागणी राजेश माळचे व मनोहर ठाकरे, रेखा रायसिग अहिरे, जिजाबाई भील, सुनंदा मराठे व भागातील महिलांनी निजामपुरचे सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निजामपुर ग्रामपंचायत हद्दीत जुनी भिलाटी असुन याभागात मोठ्या प्रमाणात आदिवासी भील समाजाचे नागरीक रहातात. याभागात ग्रामपंचायत मार्फेत कोणत्याही प्रकारची साफसफाई होत नाही. महिलांसाठी शौचालय असुन अत्यंत जुने व जिर्ण झालेले आहे. जुन्या पध्दतीने टोपलीचे संडास आहेत. ते जुने झाल्यामुळे महिलांना सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नाही. अनेक वेळा ग्रामपंचायतीत तक्रार देवूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही.

ग्रामसभेत वारंवार तक्रार करूनही उपयोग नाही
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे व स्वच्छ भारत अभियान अतर्गत शौंचालयांसाठी अनुदान मिळत असते. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी नेहमी स्वच्छतेबाबत जनतेला आवाहन करत असतात. पंरतु निजामपुर ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही. आदिवासी भील समाजाची महिलांना शौचालय नाही. ग्रामपंचायतीत गेल्या दोन वर्षांपासुन अनेक ग्रामसभेत शौचालयाबाबत महिलांनी व पुरुषांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या आहेत. फक्त आश्वासन दिले जात आहे. या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.तरी एक महिन्याच्या आत आदिवासी महिलासाठी नविन शौचालयाचे बांधकाम झाले नाही तर सर्व आदिवासी महिला निजामपुर ग्रामपंचायतमध्ये येवुन शौच करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शासनाकडुन आदिवासी समाजाचा भागात विकास कामांसाठी निधी येत असतो हा निधी आदिवासी महिलांसाठी नविन शौचालयाचे बांधकाम करा अशी आदिवासी महिला व सर्व समाजातील महिलांनी सरपंच यांच्याकडे केली आहे.