निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील मोठी असलेले निजामपुर ग्रामपंचायतीला नविन ग्राम विकास अधिकार्यांच्या नियुक्ती करा. निजामपुर ग्रामपंचायत ला मुख्य कार्यकारी अधिकारी गगाथरण देवराजन यांनी अचानक भेट देवुन निजामपुर ग्रामपंचायतीची दप्तराची पाहणी केली होती. अपुर्ण दप्तर आढळून आल्याने व कामात दिरंगाई मुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी वि.र.नवाणकर याना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा शिस्त व अपिल नियम 1964 मधील भाग 2 चया पोटकलम 3(1) ब नुसार दि 26 जुलै रोजी सेवेतुन निलंबित करुन त्यांना निलंबन काळात मुख्यालय पंचायत समिती शिंदखेडा ठेवण्यात आदेश केले आहे.
ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी नसणार
15 दिवसांपासुन ग्राम विकास अधिकारी नाही 15 ऑगस्ट हे भारताचे स्वतंत्र दिवस असल्याने या दिवशी गावाचा जनतेची ग्रामसभा होते. यामध्ये शासनाच्या कल्याण कारी योजनेची माहिती दिले जाते व शासनाने विविध योजनेचे लाभार्थ्यांनाचे ठराव पास करून शासनाला पाठवले जाते. पंरतु ग्राम विकास अधिकारी नसल्याने त्रास होणार आहे. तरी जिल्हा परिषदेने निजामपुर ग्रामपंचायतीला नवीन ग्राम विकास अधिकारीची नियुक्ती करावी अशी मागणी निजामपुर ग्रामस्थांनी केली आहे.
अतिरिक्त बोजा घेण्यास नकार
ग्रामविकास अधिकारी नवाणकर यांच्याकडील निजामपुर व दुसाणे ग्रामपंचायतींचा चार्ज निजामपुर ग्रामपंचायतीचे चार्ज जैताणेचे ग्रामविकास अधिकारी वाय. डी. सोनवणे यांच्याकडे तर दुसाने ग्रामपंचायतीचा चार्ज इदवे ग्रामविकास अधिकारी पी. बी. मोराणेंकडे देण्यात आला आहे. निजामपुर ग्रामपंचायतीचा चार्ज वाय. डी. सोनवणे यांच्याकडे असल्याने त्यांनी चार्ज घेतलेला नाही. माझ्याकडे दोन ग्रामपंचायतींचे चार्ज असल्याने व जैताणे ग्रामपंचायत मोठी असल्याने चार्ज मला देवुन असे विनंती अर्ज पंचायत समितीला दिलेला आहे .
नागरिकांना त्रास
जैताणेचे ग्रामविकास अधिकारी सोनवणे यांना निजामपुर ग्रामपंचायतीचा चार्ज दिल्यास जैताणेचे सरपंच संजय खैरनार सह ग्रामपंचायत सदस्य आंदोलन करणार आहे. 26 जुलैपासुन निजामपुर ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी नसल्याने जनतेचे काम होत नाही. घराचा उतारा, रहिवासी दाखला असे विविध ग्रामपंचायतीकडुन मिळणारे दाखल मिळणयासाठी त्रास होत आहे.