निजामपुर ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारीपदी पवार

0

निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर ग्रामपंचायतीला ग्राम विकास अधिकारी नसल्याचे वृत्त दैनिक जनशक्ती ने 9 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तांची दखल प्रशासनाने घेवुन 11 ऑगस्ट रोजी नवीन ग्रामविकास अधिकारी एस. एन. पवाराची नियुक्ती करण्यात आली आहे. 14 ऑगस्ट रोजी निजामपुर ग्रामपंचायतीचा पदभार पवार यांनी घेतला आहे . निजामपुर ग्रामपंचायत कार्यालयास 26 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी अचानक भेट दिली होती. या भेटीत त्यांनी निजामपुर ग्रामपंचायतीची दप्तराची पाहणी केली होती. या तपासणीत गंगाथर यांना ग्रामपंचायीत अपुर्ण दप्तर आढळून आले होते. तसेच निजामपुर ग्रामपंचायतीचे अपुर्ण दप्तर सोबत नेवुन ग्राम विकास अधिकारी वि.र.नवाणकर यांना 26 जुलै रोजी सेवेतुन तडकाफडकी निलंबित केले होते. नागरिकांनी त्यांची कामे खोळंबल्याने ग्रामविकास अधिकार्‍यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्याची मागणी केली होती.श्री.पवारांनी आज पदभार स्विकारल्य ाने नागरिकांची कामे मार्गी लागेल.

15 दिवसांपासून पद होते रिक्त
नंतर जैताणेचे ग्राम विकास अधिकारी वाय. डी. सोनवणेंकडे प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. पंरतु, जैताणे ग्रामपंचायत मोठी असल्याने काम जास्त असल्याने त्यांनी निजामपुर ग्रामपंचायतीचा पदभार घेतला नाही. यानंतर 9 ऑगस्ट रोजी दैनिक जनशक्ती ने निजामपुर ग्रामपंचायतीला नविन ग्राम विकास अधिकारींची नियुक्ती करा 15 आँगसट हे भारताचे स्वतंत्र दिवस असल्याने या दिवशी ग्रामसभा होते शासनाचा कल्याण कारी योजनेची माहिती जनतेला दिली जाते व शासनाचा विविध योजनेचे लाभार्थी चे ठराव पास करुण शासनाला पाढवले जाते व 15 दिवसापासुन ग्राम विकास अधिकारी नसल्याचे जनतेचे कामे होत नाही सविस्तर बातमी छापली होती. याची दखल जिल्हा परिषदेने घेतली व दोन दिवसांत निजामपुर ग्रामपंचायतीला ग्राम विकास अधिकारी एस एन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी 14 आँगस्ट रोजी पदभार स्वीकारल्याने निजामपुर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.