निजामपुर । साक्री तालुक्यातील निजामपुर जैताणे जिल्हा परिषद उर्दू शाळेत योग दिवस साजरा करण्यात आला. उर्दू शिक्षक अबुइम्रान अनसारी यांनी योग बाबत माहिती व धडे मुलांना देण्यात आले. योग केल्यावर फायदे काय व योग केलेल्या आपले आरोग्य चांगले राहते तसेच मुलांना योगची तालीम करण्यात आली. यावेळी मुखाध्यापिका महेजबीनबानो शेख व शाळा व्यसथापन समिती अध्यक्ष अबरारशेख व सदस्य उपस्थितीत होते. जगात योग दिवस साजरा करण्याचे आवाहन भारताचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी दि 27 सषटेबर 2014 रोजी 69 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत केला होता. त्या आवाहनला प्रतिसाद महणुन दि 21 जुन 2015 रोजी दिल्ली येथे योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जगातील 84 देशातील 1300 प्रतिनिधी सह 35985 विदेशात व भारतातील नागरीकांनी सहभाग करून दो गिनीज बुक मध्ये भारताची नोंद करण्यात आली. पहिल्या योग दिवस भारतात साजरा करण्यात आला. योगामुळे व्यायाम होत आरोग्य तंदुरुस्त राहतो शरीराला व्यायामाची सवय लागते यामुळे निजामपुर जैताणे जिल्हा परिषद उर्दू शाळेत जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.