निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर जैताणे गावातील लोकांची गैरसोय दूर होण्या साठी निजामपुर नाशिक नविन बस सेवा सुरू करण्यात आली.
यावेळी बससेवेला हरी झेंडी दाखवतांना निजामपुर सरपंच प्रतिनिधी विजय राणे, माजी सरपंच अरूण वाणी, ताहीर बेग मिरजा, प्रविण वाणी, जाकीर.तांबोळी आदी उपस्थित होते. निजामपुर येथून नाशिकसाठी सकाळी नऊ व दहा वाजता दोन नविन बस साक्री डेपो ने सुरू केले आहे. नाशिक येथून निजामपुरसाठी दुपारी 1 व 2 दरम्यान येण्याची सोय केली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. माळमाथा परिसरातील प्रवासी याचा फायदा होणार आहे. यावेळी वसीम पठाण, राजेन्द्र देवरे, विशाल मोहने, विश्वास मुजगे,देवबा माळी उपस्थित होते.