निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील मराठी व उर्दू जिल्हा परिषद 12 शाळांना हर्षल विभाडीक व क्वालिटी गुपचा मदतीने शाळेना सौर पँनलचे वाटप करण्यात आले. यासाठी 3 लाख 76 हजारांचे सौर पँनलचे देण्यात आले. यात निजामपुर 4 शाळा 4 जैताणे, भामेर, खुडाणे, रोजगार, राजणीपाडा जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. सौर पँनेल शाळांना मिळावे यासाठी प्रगती फाँऊडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव यांच्या पर्यत्नांनी व हषल विभाडीक व क्वालिटी गुप मदतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सौर पँनल कार्यक्रम अध्यक्षस्थानी आदर्श विद्यालयाचे अध्यक्ष अॅड. शरदभाई शाह हे होते.
12 मराठी व उर्दू शाळांचा समावेश
यावेळी गटशिक्षणाधिकारी बी. बी. भील, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र पगारे, व्ही. व्ही. पवार, बाळूशेठ विसपुते, जिल्हा परिषद सदस्य उषाबाई ठाकरे, इंदुबाई खैरनार, पं. स. सदस्य सुनिता बचछाव, निजामपुरचे सरपंच साधना राणे, साक्री नगरपंचायतींचे बांधकाम सभापती सुमित नागरे, जैताणे सरपंच संजय खैरनार, परागवळे, भामेर सरपंच मनिषा सोनवणे क्रेद प्रमूख शोभा देसले, हाजी लियाकत सैयद हाजी, लतीफ तांबोळी, अरुण येवले, धर्मराज चिंचोले, विजय राणे, मिलींद भार्गव, नंदकुमार विसपुते, पावबा बचछाव, प्रकाश बचछाव रामचंद्र भलकारे, विशाल चौरे, सागर पवार, धनराज सोनवणे, पत्रकार रघुवीर खारकर, रविंद्र सुर्यवशी आदी उपस्थितीत होते. आदर्श उपक्रम यशस्वीतेसाठी क्वालिटी गुपचे मिलिंद भार्गव, महेश राणे, जाकीर तांबोळी, परेश पाटील, तुषार भदाणे, संदिप चिचोले, भुषण भदाणे, जितेंद्र पाटील, विशाल मोहने की शोर वाघ तसेच सर्व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापाक शिक्षक शिक्षिका यांनी कामकाज पाहिले. सुत्रसंचालन व प्रसताविक प्रा. सुधाकर जाधव यांनी केले व आभार प्रकाश बचछाव यांनी मानले.