निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात निजामपुर जैताणे गावी निजामपुर पोलीस स्टेशनच्यावतीने गावातील शांतता कमेटीचे सदस्य, पोलीस मित्र व पत्रकार बंधु व गावात हिंदू मुस्लीम बांधवांसाठी ईफतार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यापार्टीचे अध्यक्ष धुळे अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे होते. याप्रसंगी निजामपुर पोलीस अंतर्गत खुड़ाणे, कढरे, छावड़ी, ऐचाळे या गावांना महात्मा गांधी तंटा मुक्त पुरस्कार पानसरे याच्या हस्ते देण्यात आले. खुडाणे गावाला पाच लाख, कढरे गावाला तीन लाख, ऐचाळे गावाला तीन लाख व छावडी अमोदे गावाला दोन लाख शासनाच्या वतीने गाव विकास कामासाठी चेक देण्यात आले.
हिंदू-मुस्लीम बांधव एकतेचे प्रतिक
निजामपुर पोलीस स्टेशन अंतर्गत 78 गावे 5 बिटिया आहेत. यावेळी शरद भाई शाह, संजय खैरनार, पांडुरंग महाराज, सैयद खारकर, अजून पटले यांनी मार्गदर्शन करून मुस्लीम बांधवांना ईदचा शुभेच्छा दिल्या. अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांनी कायदा सुवसथेबाबत व एकोपाचे मार्गदर्शन करून शांतता रहावी. हिंदू मुस्लीम बांधव एकमेकांच्या संयुक्त सण साजरा करतात हे एकतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. यावेळी शरदभाई शाह, वासुदेव वाणी, संजय खैरनार, विजय राणे, पराग गवळे, धनराज गवळे, ताहीरबेग मिरजा, राजेश बागुल, अजीत शाह, परेश पाटील, नाना गवळे, रघुवीर खारकर ,भगवान जगदाळे, रविद्र सुर्यवंशी, नासीर सैयद, अकबर शेख, अलताफ सैयद, तौफीक शेख, तनवीर शेख ,राजेंद्र माळी यांच्यासह हिंदू मुस्लीम बांधव उपस्थितीत होते. सुत्रसंचालन प्रा सुधीर जाधव यांनी तर आभार सपोनि अर्जुन पटले यांनी मानले.