निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर ग्रामपंचायत पंचायतीत भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्यावतीने दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाचा प्रशिक्षण कार्यशाळेचे तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती साक्री येथे करण्यात आले होते. रोजगार मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी राव दहिते होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत आमदार डी.एस.अहिरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सरपंच साधना राणे, पंचायत समिती सदस्य वासुदेव वाणी, चंदुलाल जाधव, लक्ष्मीकांत शाह, ताहिरबेग मिरजा, प्रविण वाणी, अजीतशाह सलीम पठाण, रघुवीर खारकर, युसुफ सैयद, विजय राणे, जाकीर ताबोळी, अझर शेख, चीधु शिपी, विस्तार अधिकारी पी.एस.महाले, जगदिश खाडे, राजेंद्र कुकावळकर, ग्रामविकास अधिकारी शिवाजी पवार, योगेश सोनवणे, शरद पाटील, उपसरपंच रजनी राणे, बापुमहाले, ललीत आरुजा आदींची उपस्थिती होती. यावेळी तरुणांची मोठी उपस्थिती होती.
87 तरुणांनी घेतले प्रशिक्षण
संदिप देवरे, आझिम शेख यांनी प्रशिक्षण रोजगाराबाबत माहिती दिली. प्रशिक्षणा साठी शासनातर्फे खर्च करण्यात आले. यावेळी आमदार अहिरे यांनी बेरोजगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. झेडपी अध्यक्ष दहिते यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील 87 मुलानी प्रशिक्षण घेतले आहे. 26 बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आहे. सूत्रसंचालन सुधाकर जाधव यांनी केले. आभार चंद्रकांत भावसार यांनी मानले.