निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील मोठी ग्रामपंचायत निजामपुरची असुन एकूण 17 सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे.स्वछ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय असणारे 1252 पैकी 477 कुटुंबाकड़े शौचालय नाही.याबाबत सर्व कुटुंबांना नोटीसा ग्रामपंचायत देणार आहे. निजामपुर ग्रामपंचायतचे सरपंच साधना राणे व उपसरपंच रजनी राणे व ग्रामविकास अधिकारी व्ही.आर.नावनकर व सदस्यांनी 477 कुटुंबांकड़े शौचालय नाही.अश्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालयचे बांधकाम पुर्ण केले व करणार असणार आहेत या कुटुंबांना शासनाकड़ून प्रोत्साहनपर बारा हजार अनुदान देण्यात येणार आहे.
कुटुंबाची भेट घेवुन सांगणार शौचालयचे फायदे
निजामपुर गावात एकुण 1252 कुटुंब आहेत. त्यापैकी 775 कुटुंबांकड़े वैयक्तिक शौचालय आहे. 56 लाभार्थीना प्रत्येकी बारा हजार अनुदान वाटप केले आहे. तसेच 26 कुटुंबाचे मंजुरी साठी प्रस्ताव पंचायत समिती साक्रीकड़े पाठविले आहे. निजामपुर गावात 477 कुटुंब कड़े शौचालय नाही त्यांनी बांधकाम करावे त्यासाठी घरोघरी जाऊन कुटुंबाची भेट घेवुन शौचालयचे फायदे काय आहे. यांची जगजागुती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांची,अंगणवाड़ी मदतनीस कार्यकर्ते,ग्रामपंचायतचे 17 सदस्य सरपंच,उपसरपंच व कर्मचारी यांची मदत घेवुन कामाचे नियोजन करण्यात येणार आहे.यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2017 देण्यात येणार आहे.
उघड्यावर शौचास बसणार्यांना इशारा
निजामपुर ग्रामपंचायत हद्दीत उघड़यावर किंवा सार्वजनिक जागेवर शौचास बसणे. आरोग्यासाठी धोका आहे असे करणार्यांवर यापुढे मुंबई अधिनियम,1951 मधील भादवि कलम 115 व 117 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. निजामपुर गावात सरकारी कर्मचार्याच्या मदतीने गावात जाऊन कुटुंबांना शौचालयबाबत तोड़ी महत्त्व ही पटवु देणे. शौचालयचे फायदे काय, शासनाकड़ुन मिळणारे अनुदानबाबत माहिती देवुन शौचालय बांधकामसाठी मदत करने, मार्गदर्शन करने व नविनच शौचालय बांधकाम करणेसाठी अंतिम मुदत 31 जुलै 2017 देण्यात आली आहे. याकरीता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी घरोघरी जावून याबद्दल माहिती देणार आहे.
ग्रामपंचायत मेहनत घेणार
निजामपुर गाव स्वछ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त करणार आहे यासाठी सरपंच साधना राणे, उपसरपंच रजनी राणे, ग्रामविकास अधिकारी व्ही आर नावनकर व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी,शासकीय कर्मचारी हे मेहनत घेणार आहेत व सामाजिक कार्यकत्यांनी हागणदारी मुक्त गांव होण्यासाठी मदत व सहकार्य करावे असे ग्रामपंचायत ने आवाहन केले आहे.