निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर जैताणे गावी राज्य शासनाने तहसील विभागातील.पुरवठा विभागाने पि.ओ.एस मशिन स्वस्त धान्य दुकानदारांना मिळाले आहे. यामशिनीची सुरूवात 1 जुलै पासुन होणार असुन पीओएस मशिन मार्फत धान्य पुरवठा होणार आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासनाच्या पीओएस मशिनाचे स्वागत केले आहे.
निजामपुर -जैताणे गावी 10 स्वस्त धान्य दुकान आहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरणात सुसत्रता आणण्यासाठी व नागरीकांना व ग्राहकांना चांगली सेवा देता यावी यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यासाठी माळमाथा परिसरात सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना पी.ओ.एस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. साक्रीतालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांवर हे मशिन बसविण्यात येत असुन 250 पेक्षा जास्त मशिन वाटप करण्यात आले आहे. यात निजामपुर जैताणे गावाला 10 मशिन मिळाले आहे. यामशिनमुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य पोहोचविणयास मदत होणार असुन यामशिनवर स्वस्त धान्य दुकानास जोडलेल्या ग्राहकांचा तपशिल आहे. पि.ओ.सी मशिनाची सुरूवात 1 जुलै पासुन होणार आहे.